भारताची ऐतिहासिक कामगिरी! रेल्वे लाँचरवरून ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
हे क्षेपणास्त्र प्रथमच रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चरवरून प्रक्षेपित करण्यात आले असून, यामुळे भारत प्रगत तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे.
Continues below advertisement
“रेल्वेवरून ‘अग्नी‑प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी”
Continues below advertisement
1/6
'अग्नी-प्राईम' हे 2000 किमी मारक क्षमतेचे नवीन पिढीचे क्षेपणास्त्र असून, त्यात कॅनिस्टराइज्ड लॉन्च, अचूक मार्गदर्शन प्रणाली आणि वेगवान प्रतिसाद यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.
2/6
हे क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) च्या वापरासाठी विकसित करण्यात आले असून DRDO ने त्याची रचना व विकास केला आहे.
3/6
ही प्रणाली रेल्वे नेटवर्कवरून सहज हलवता येते, त्यामुळे युद्धपरिस्थितीत कमी वेळात लपून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते, जे शत्रूसाठी अत्यंत धोकादायक ठरते.
4/6
या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून DRDO, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले व 'अग्नी-प्राईम' क्षेपणास्त्राची रेल्वेवर आधारित लाँचरवरून यशस्वी चाचणी झाल्याचे सांगितले.
5/6
हे नवीन पिढीचे क्षेपणास्त्र असून 2000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत मारक क्षमता असलेले आहे आणि यात विविध अत्याधुनिक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
Continues below advertisement
6/6
आज रेल्वेवर चालणाऱ्या खास मोबाईल लाँचरवरून पहिली यशस्वी चाचणी झाली. ही प्रणाली देशभर सहज हालवता येते आणि अत्यल्प वेळेत लपून क्षेपणास्त्र प्रक्षेपित करता येते.
Published at : 25 Sep 2025 12:51 PM (IST)