Congress MLA : 'क्वालिटी' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदार चर्चेत; कोण आहेत सोफिया फिरादौस

काँग्रेसच्या 32 वर्षीय महिला आमदाराने इतिहास रचला आहे, ओडिशातील बाराबती-कटक विधानसभा मतदारसंघात सोफिया आमदार बनल्या आहेत.

First Muslim MLA Sofia firdous viral video

1/8
काँग्रेसच्या 32 वर्षीय महिला आमदाराने इतिहास रचला आहे, ओडिशातील बाराबती-कटक विधानसभा मतदारसंघात सोफिया आमदार बनल्या आहेत. विशेष म्हणजे ओडिशातील त्या पहिल्या मुस्लीम महिला आमदार आहेत.
2/8
ओडिशा विधानसभेत नुकतेच त्यांनी राज्यातील शिक्षणाचा विषय लावून धरल्याचं पाहायला मिळालं. क्वालिटी एज्युकेशनच्या मुद्द्यावरुन त्यांनी सभागृहात आवाज उठवला होता.
3/8
सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्व शाळा, सर्व कॉलेजमध्ये क्लालिटी एज्युकेशनवर भर दिला जावा, असे त्यांनी म्हटले.
4/8
सोफिया या सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या युवती आमदार असून इंस्टाग्रामवर त्यांचे 1 लाख 29 हजार फॉलोअर्स आहेत. आपल्या राजकीय घटनांबाबत त्या अकाऊंटवरुन व्यक्त होताना दिसून येतात. आताही, त्यांनी विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
5/8
येथील विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यातील क्वालिटी एज्युकेशनवर भर दिला, त्यामुळे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
6/8
सोफिया फिरदौस ह्या काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोहम्मद मोकिम यांच्या कन्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार पूर्ण चंद्र महापात्रा यांचा 8,001 मतांनी पराभव करुन आमदारकी मिळवली आहे.
7/8
32 वर्षीय सोफिया यांनी कलिंगा इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी येथून सिविल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू (IIMB) येथून एक्झीक्यूटिव्ह जनरल मॅनेजमेंट प्रोग्रामचेही शिक्षण घेतले आहे.
8/8
सोफिया फिरदौस या विवाहित असून उद्योगपती असलेल्या शेख मेराज उल यांच्यासमवेत त्यांचं लग्न झालं आहे. विशेष म्हणजे ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्‍यांनीही याच विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Sponsored Links by Taboola