आणि भारत-पाकिस्तानदरम्यान शिमला करार झाला..
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण आणि सहकार्यात्मक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बनवली गेलेली एक चौकट म्हणून या कराराकडे पाहिले गेले.
Simla agreement
1/6
शिमला करार हा एक शांतता करार होता जो 2 जुलै 1972 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान करण्यात आला. ज्याला पाकिस्तानच्या पराभवानंतर बांग्लादेशच्या निर्मितीचे कारण मानले जाते. (Photo Source: Google)
2/6
हा करार 1971 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धानंतर झाला.ज्यामुळे, पाकिस्तानने बांगलादेशला राजनैतिक मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला. (Photo Source: Google)
3/6
भारताने बांग्लादेश मुक्ती युद्धात पाकिस्तानी सैन्याविरुद्ध मुक्ती वाहिनीच्या बाजूने पूर्व पाकिस्तानमध्ये केलेल्या हस्तक्षेपानंतर याचा पाया रचला गेला. (Photo Source: Google)
4/6
या करारावर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली होती. (Photo Source: Google)
5/6
कराराचा मुख्य उद्देश, दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत संबंध सुरळीत करणे हा होता. (Photo Source: Google)
6/6
परंतु, 23 एप्रिल 2025 मध्ये भारताने 2025 च्या पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला .पाकिस्ताननेही 24 एप्रिल 2025 रोजी सिमला करार रद्द केला आणि जमीन आणि हवाई मार्ग बंद करून भारतासोबतचा व्यापार थांबवला होता. (Photo Source: Google)
Published at : 02 Jul 2025 04:10 PM (IST)