PHOTO : Bhagat Singh - जाज्वल्य देशभक्तीचे उदाहरण आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत
भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला एका देशभक्त कुटुंबात झाला. भगत सिंह यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील किशन सिंह जेलमध्ये होते तर त्यांचे काका अजित सिंह हे देखील इंग्रजांविरुद्ध लढा देत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालिनयवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंगच्या मनावर मोठा परिणाम झाला आणि त्याने ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावायची प्रतिज्ञा केली.
भगतसिंगने लाहोर नॅशनल कॉलेजमधील शिक्षण घेत असताना अनेक युवकांना जोडलं आणि 'नौजवान भारत सभा'ची स्थापना केली
लाला लाजपत राय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्याचा बदला म्हणून भगतसिंग आणि राजगुरुने साँडर्सची हत्या केली.
दिल्लीच्या सेंट्रल असेम्ब्लीमध्ये त्याने बॉम्ब फोडला आणि इंग्रजी सत्तेला खुलं आव्हान दिलं.
सॉडर्सच्या हत्येच्या खटल्यात भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी भगतसिंगने देशासाठी आपल्या प्राणाचा त्याग केला.