Sanjay Raut In Bharat Jodo: हाडं गोठवणारी थंडी आणि पावसात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जम्मूत, खासदार संजय राऊतांचाही सहभाग
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये आहे. या वेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सहभागी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यासाठी काल ते जम्मूमध्ये दाखल झाले. इथे येताच त्यांनी गेले अनेक दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या काश्मिरी पंडितांची भेट घेतली.
जर मोदींना काश्मिरी पंडितांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर आम्हाला सत्ता द्या आम्ही सोडवतो असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत पहिल्यांदाच राहुल गांधींची भेट घेणार आहे.
संजय राऊतांच्या भेटीनंतर शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध आणखी दृढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमधील लाल चौकात समारोप होणार असून तिथंही संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारत जोडो यात्रेमधे सहभागी झालेल्या संजय राऊतांवर आशिष शेलारांची टीका केली.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होणार आहे
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून गेली आहे.