In Pics : देशभरात आजपासून बदलणार सात महत्त्वाचे नियम; थेट खिशावर होणार परिणाम
1 जून 2021 म्हणजेच आजपासून देशातील काही महत्त्वाच्या सुविधांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये घरगुती वापरातील सिलेंडरपासून हवाई मार्गानं प्रवासाच्या सुविधांचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरगुती गॅसच्या किमती - 1 जूनपासून घरगुती वापरातील एलपीजीच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील सरकारी तेल कंपन्या एलपीजीच्या किमती निर्धारित करतात. यामुळं किमती वाढण्याचा किंवा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
YouTube च्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांना द्यावा लागणार कर -जर तुम्ही YouTube या माध्यमातून पैसे कमवत असाल, तर तुम्हाला यासाठी आता YouTube लाच काही पैसे द्यावेही लागणार आहेत. ज्यांना अमेरिकन व्ह्यूअर्स मिळाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे पैसे मिळाले आहेत त्यांचा परतावा करस्वरुपात करावा लागणार आहे.
देशांतर्गत हवाई प्रवास महागला- देशांतर्गत हवाई वाहतूक, विमान प्रवास 13 टक्क्यांपासून 16 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 40 मिनिटांचा प्रवास असणाऱ्या विमानांचं कमीत कमी भाडं 2300 वरुन 2600 रुपये करण्यात आलं आहे. तर, 46 ते 60 मिनिटांसाठीच्या प्रवासामध्ये भाडं 2900 वरुन 3300 इतकं करण्यात आलं आहे.
पीएफ अकाऊंटला आधारशी लिंक करणं अनिवार्य - प्रोविडेंट फंड म्हणजेच पीएफशी संबंधित नियमांमध्ये आज बदल होत आहेत. नव्या नियमांनुसार प्रत्येक खातेधारकाचं पीएफ खातं आधारशी लिंक केलं जाणं अनिवार्य आहे. 1 जून पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. नोकरी देणाऱ्या कंपनीकडून असं न केलं गेल्यास सब्सक्रायबरच्या खात्यात कंपनीचं योगदान थांबवलं जाऊ शकतं.
बँक ऑफ बडोदामध्ये पॉझिटीव्ह पे सिस्टीम- बँक ऑफ बडोदाच्या खातेधारकांसाठी आजपासून चेक अर्था धनादेशानं पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. बँकेकडून खातेधारकांसाठी पॉझिटीव्ह पे कन्फर्मेशन सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये चेक शी संबंधित काही माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं देय बँकेला द्यावी लागणार आहे. ही माहिती एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमच्या माध्यमातून दिली जाऊ शकते.
गूगल फोटोजचा स्पेस आता मोफत नाही- 1 जूननंतर गुगल फोटोजमध्ये तुम्हाला अमर्याद फोटो अपलोड करता येणार नाहीत. गुगलच्या माहितीनुसार 15 जीबी इतका स्पेस प्रत्येक युजरला देण्यात येईल. यामध्ये ईमेलचाही समावेश आहे, फोटो आणि गुगल ड्राईव्हचाही. तम्हाला 15 जीबीपेक्षा जास्त स्पेस वापरण्यासाठी गुगलला पैसे भरावे लागणार आहेत. यापूर्वी हा स्पेस मोफत वापरता येत होता.
इनकम टॅक्स ई - फायलिंग साईट - इनकम टॅक्स विभागाचं ई- फायलिंग पोर्टल 1 ते 6 जून पर्यंतच्या कालावधीत काम करणार नाही. आयकर विभागाकडून 7 जूनपासून करदात्यांसाठी नवं पोर्टल लाँच करत आहे. 7 जूनपासून http://INCOMETAX.GOV.IN हे नवं पोर्टल वापरात येणार आहे.