Uttarakhand : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, संरक्षण प्रशिक्षण अकादमीची इमारत कोसळली
उत्तराखंडमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु असून यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (PC:PTI)
उत्तराखंडमधील डेहराडून डिफेन्स अकादमीची इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. (PC:PTI)
सध्या अनेक भागांत बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. (PC:PTI)
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून येथली आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये जाऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. (PC:PTI)
मुसळधार पावसामुळे ऋषिकेशमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. बाधित भागातून स्थानिकांचं स्थलांतर करण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरु आहे. (PC:PTI)
पूर आणि भूस्खलन झालेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि प्रशासनासाला निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. (PC:PTI)
मुख्यमंत्री धामी यांनी सांगितलं की, सर्व जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. (PC:PTI)
उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (PC:PTI)
टिहरीचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष घिलडियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालपुलजवळ सॉन्ग नदीच्या काठावर असलेल्या डेहराडून डिफेन्स अकादमीची इमारत सोमवारी पहाटे कोसळली. (PC:PTI)