Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India: राहुल गांधी बनले मास्टरशेफ; तामिळनाडूतील फॅक्टरीत बनवले चॉकलेट, पाहा फोटो
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी तामिळनाडूच्या उटी येथील चॉकलेट कारखान्याला भेट दिली, तेथे कार्यरत सर्व महिलांचं त्यांनी कौतुक केलं आणि त्यांच्याकडून चॉकलेट बनवायचं ट्रेनिंग सुद्धा घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींनी युट्युबवर 7 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे, यात बेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. राहुल गांधी चॉकलेट बनवण्याचे धडे घेत आहेत.
उटीच्या चॉकलेट फॅक्टरीतील महिलांकडून राहुल गांधींनी काम करता करता तामिळ भाषा शिकण्याचाही प्रयत्न केला.
राहुल गांधींनी चॉकलेट बनवत असताना बहिणीची आठवण देखील काढली. तुम्ही माझ्या बहिणीला इथे बोलवायला हवं, असं ते म्हणाले.
राहुल गांधींनी चॉकलेट बनवण्याची संपूर्ण कृती बारकाईने जाणून घेतली.
चॉकलेट बनवण्याच्या संपूर्ण प्रोसेसचा आनंद राहुल गांधींनी घेतला.
राहुल गांधी सध्या देशभरात विविध छोट्या उद्योगधंद्यांना भेट देत आहेत आणि त्यांचं धैर्य वाढवत आहेत.
चॉकलेट फॅक्टरीला दिलेल्या भेटीत त्यांनी तिथे काम करणाऱ्या लोकांशी बातचीत केली.
तेथील कार्यरत बेकरच्या मुलीशीही त्यांनी संवाद साधला.
अगदी कुशलतेने राहुल गांधींनी चॉकलेट तयार केले.
प्रत्येक कामादरम्यान राहुल गांधी संपूर्ण एकाग्रतेने ते काम पार पाडतात.
राहुल गांधींनी बनवलेल्या चॉकलेटचा आस्वाद देखील घेतला आणि आतापर्यंत चाखलेल्या चॉकलेटपेक्षा हे चॉकलेट उत्तम असल्याचं ते म्हणाले.
चॉकलेट फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी राहुल गांधींनी हॉट चॉकलेट देखील चाखायला दिलं, ज्यानंतर राहुल गांधींनी त्याची चव अतिशय चांगली असल्याचं सांगितलं.
राहुल गांधींनी फॅक्टरी मॅनेजरशी देखील चर्चा केली आणि काही समस्या असल्यास मी नक्कीच मदत करेल, असं आश्वासन देखील दिलं.
तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलीने राहुल गांधींकडे शेवटी ऑटोग्राफ मागितला आणि राहुल गांधींनी तो दिलाही. पण त्यानंतर...
राहुल गांधींनी त्या छोट्या मुलीकडे तिचा ऑटोग्राफ मागितला आणि तिच्या सहीच्या पानाची घडी घालून आठवण म्हणून खिशात ठेवली.