Rahul Gandhi : पहिल्यांदा पहलगाममध्ये जखमींची भेट घेतली, आता राहुल गांधी शुभम द्विवेदी कुटुंबाच्या भेटीसाठी कानपुरात पोहोचले

Rahul Gandhi in Kanpur : शुभम द्विवेदी 31 वर्षांचा होता आणि तो कानपूरमध्ये स्वतःचा व्यवसाय चालवत होता. त्याचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी झाले होते.

Rahul Gandhi in Kanpur

1/11
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील कानपूरला पोहोचले. यावेळी त्यांनी शुभमला श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबाचे सांत्वन केले.
2/11
राहुल गांधी यांनी संपूर्ण कुटुंबाला वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले.
3/11
द्विवेदी कुटुंबाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना शुभमला शहीद दर्जा देण्याची मागणी केली.
4/11
राहुल गांधी म्हणाले, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे." त्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. राहुल गांधींनी शुभमच्या कुटुंबाची सुमारे अर्धा तास भेट घेतली.
5/11
तत्पूर्वी, राहुल गांधींनी मंगळवारी अमेठी आणि रायबरेलीलाही भेट दिली. परतताना ते कानपूरला आले होते.
6/11
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 23 एप्रिल रोजी शुभमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी कानपूरला आले होते.
7/11
शुभम द्विवेदी 31 वर्षांचा होता आणि तो कानपूरमध्ये स्वतःचा व्यवसाय चालवत होता. त्याचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी झाले होते. पहलगाममध्ये शुभमची त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी आल्याने द्विवेदी कुटुंब हादरले.
8/11
तत्पूर्वी अमेरिका तत्काळ सोडत राहुल गांधी मायदेशात परतले होते. त्यानंतर त्यांनी काश्मीर दौरा केला.
9/11
यावेळी त्यांनी जखमींची रुग्णालयात विचारपूस केली होती.
10/11
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची सुद्धा त्यांनी भेट घेत चर्चा केली होती.
11/11
यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्येही सहभाग घेत घटनेचा निषेध नोंदवला होता.
Sponsored Links by Taboola