Chenab Bridge: 1300 मीटर लांब, 467 मीटर ऊंच...रेल्वेचा काश्मीरमधील चिनाब पूल का महत्त्वाचा? लवकरच उद्घाटन होणार
1.31 किलोमीटर लांब असलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चिनाब पूल उधमपूर-श्रीनगर-मारामुल्ला रेल्वे लिंकचा भाग आहे.
चिनाब पूल
1/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जूनला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथं ते जगातील सर्वात ऊंचीच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील. या पुलाच्या उद्घाटनानंतर कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेन सुरु केली जाईल. काश्मीरमधील पर्यटनासाठी याचा फायदा होईल.
2/7
हा रेल्वे पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक परियोजनेचा भाग आहे. सरकारनं म्हटलं की नक्कीच इतिहासातील भारतातील रेल्वे योजनेसमोरील सर्वात मोठा सिविल इंजिनअरिंमधील आव्हानात्मक प्रकल्प आहे.
3/7
2003 मध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर 20 वर्षांहून अधिक काळ लागला आहे. समुद्रसपाटीपासून 359 मीटर उंचावर हा पूल बनवण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल आहे.
4/7
हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर ऊंच आहे आणि कुतुब मिनार पेक्षा पाच पट ऊंच आहे. या पुलाच्या निर्मितीत वजा 10 ते 40 अंश सेल्सिअसच्या तापामनात टिकून राहील अशा 2866 मेगाटन स्टीलचं वापर करण्यात आला आहे.
5/7
1.31 किलोमीटर लांबीच्या पुलासाठी 1486 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. चिनाब पूल उधमबूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंकचा भाग आहे. पृथ्वीवरील आव्हानात्मक भागातील 272 किलोमीटर लांबीच्या मेगा प्रोजेक्टचा भाग आहे.
6/7
केंद्र सरकारनं या योजनेसाठी 42 हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार या मार्गाचा 90 टक्के भाग 943 पुलांचा आणि 36 बोगद्यांचा आहे. यामध्ये T-50 चा देखील समावेश आहे. हा भारतातील सर्वात लांबीचा रेल्वे बोगदा आहे. त्याची लांबी 12.77 किलोमीटर इतकी आहे.
7/7
पर्यटनाला प्रोत्साहन देण्याशिवाय ही योजना काश्मीर खोऱ्यात इतर गोष्टींच्या वाहतुकीसाठी याशिवाय आरोग्य सेवा पुरवण्यामध्ये फायदेशीर ठरेल. हिवाळाच्या काळात देखील देशासोबतचा संपर्क यामुळं कायम राहील. काश्मीर खोऱ्यातील व्यापारी, सफरचंद उत्पादकांना देखील याचा फायदा होईल. यामुळं एका दिवसात काश्मीर खोऱ्यातून माल दिल्लीत पोहोचेल.
Published at : 03 Jun 2025 10:10 PM (IST)