PM Modi: पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा खास फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज ते जंगल सफारी करत असल्याचे पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकमधील निसर्गरम्य बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. यावेळी तयांनी तेथील वन्यजीवांची पाहणी देखील केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेची झलक पाहिली.
म्हैसूरमधील 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जंगल सफारीसाठी खास लूक केला आहे
कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देत पंतप्रधान मोदींनी छायाचित्रे देखील काढल्याचे पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन केलं जाणार आहे.
पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकमधल्या बंदीपूर अभयारण्याला भेट देत आहेत. 1973 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात सुरु झालेल्या प्रोजेक्ट टायगरला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
कर्नाटक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमधील थेप्पाकडू येथील हत्तींच्या छावणीला भेट दिली.