हाउ इज द जोश... नरेंद्र मोदींचं रात्री भाषण, सकाळी गाठलं 'आदमपूर' स्टेशन; वायूदलाच्या जवानांची पाठ थोपटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (13 मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली.
Continues below advertisement
Narendra modi adampur airbase
Continues below advertisement
1/8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (13 मे) सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली. तत्पूर्वी रविवारी भाषणातून पाकिस्तानला चांगलंच ठणकावलं आहे.
2/8
रविवारी रात्री देशवासीयांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी कोणतीही सूचना न देता थेट वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ (पंजाब) हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.
3/8
नरेंद्र मोदींनी येथील वायूदलाच्या तळावर भेट देऊन वायूदलाच्या जवानांशी संवाद साधला. पाकिस्तान विरूद्धच्या लढाईत भारताने, सैन्य दलाने दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.
4/8
भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाचं सेलिब्रेशनच मोदींनी केले, यावेळी जवानांमध्येही जोश पाहायला मिळाला. त्यामुळेच, हाऊ इज द जोश... हाय सर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
5/8
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक मारले गेल्याची कबुली पाकिस्तानने दिली. आधी कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने आता थेट सैनिक मारले गेल्याची कबुली दिली आहे.
Continues below advertisement
6/8
ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. त्यातले 11 सैनिक आहेत. त्यात 6 पाकिस्तान आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.
7/8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
8/8
त्यामध्ये सीमारेषेपासून 100 किलोमीटर आत असलेल्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तळाचाही समावेश होता. भारताने क्षेपणास्त्र डागून हे सर्व तळ उद्ध्वस्त केले होते.
Published at : 13 May 2025 03:42 PM (IST)