Sengol In New Parliament Building : नव्या संसद भवनाचं उद्घाटन, राजदंड विधीवत संसदेत स्थापित
देशाला आज नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द करण्यात आला.
राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला.
यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.
सातव्या शतकात एका तामिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं
इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं, त्यावर नेहरुंनी सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.
राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती. त्यानुसार हा राजदंड 15 ऑगस्ट 1947 च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरला गेला होता
पण नंतर तो प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता. आता तो संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्जीशेजारी बसवण्यात आला आहे.