Helicopter Factory : 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने आणखी एक पाऊल; देशातील सर्वात मोठं हेलिकॉप्टर उत्पादन युनिट
भारतातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. कर्नाटकातमध्ये देशातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या 6 फेब्रुवारी रोजी हस्ते या युनिटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटीकल्स लिमिटेड (The Hindustan Aeronautics Limited) म्हणजेच, एचएएलचा (HAL) हेलिकॉप्टर कारखाना सुरू होणार आहे.
हा ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे. यामुळे हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि इको-सिस्टम वाढवण्यास मदत होईल.
संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, पुढील 20 वर्षांत येथे 4 लाख कोटींची उलाढाल असलेले 1000 हून अधिक हेलिकॉप्टर बनवले जातील.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या या फॅक्टरीचं लोकार्पण करण्यात येईल. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
हा प्रकल्प 615 एकर परिसरात पसरला आहे. या कारखान्यामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला चालना मिळेल. तसेच, यामुळे हजारो नागरिकांना रोजगारही मिळेल.
या 615 एकरमध्ये परसलेल्या कारखान्यामध्ये सुरुवातीला लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करण्यात येतील. LUH हे स्वदेशी बनावटीचे आणि विकसित केलेले 3-टन श्रेणीचे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे.
सुरुवातीला या कारखान्यात दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर बनवण्यात येणार आहेत. त्यानंतर दरवर्षी त्याची क्षमता 60 ते 90 हेलिकॉप्टरपर्यंत वाढवता येईल.
LUH नंतर येथे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) तयार करण्याची योजना आहे. याशिवाय एलसीएच, एलयूएच, सिव्हिल एएलएच आणि आयएमआरएचचीही दुरुस्ती केली जाणार आहे.
या कारखान्यातून राज्यातील सुमारे 6000 लोकांना रोजगार मिळणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. याशिवाय कारखाना सुरू झाल्याने आजूबाजूच्या परिसराचाही विकास होणार आहे.