INS Vikrant : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! आयएनएस विक्रांत नौदलात सामील, काय आहे ताकद?
पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे.
आज देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका (India Made Aircraft Carrier) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे.
पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे.
तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.
आयएनएस विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील, अशी माहिती व्हाईस अॅडमिरल घोरमाडे यांनी दिली आहे.
त्यानंतर टीईडीबीएफ म्हणजेच दोन इंजिन डेकवर आधारित फायटर जेट डीआरडीओ आणि एचएएलद्वारे तैनात केले जातील. कारण TEDBF पूर्णपणे तयार होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, यादरम्यान अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते.
या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल.