Pm Modi : केवडियामध्ये राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदींची हजेरी, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथील भव्य सोहळा सुंदर फोटोमधून पाहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला हजेरी लावली. (PC : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी पंतप्रधान म्हणाले की, स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक भारत, श्रेष्ठ भारत या आदर्शांचे प्रतिनिधित्व करतो. (PC : PTI)
नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. (PC : PTI)
स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील राष्ट्रीय एकता दिनाचा कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrut Mahotsav) याची सांगता करण्यात आली. (PC : PTI)
यावेळी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणारा कार्यक्रम, 26 जानेवारीला पथ ऑफ ड्युटी परेड आणि 31 ऑक्टोबरला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात राष्ट्रीय एकता दिनाचा कार्यक्रम, या तिन्ही शक्ती राष्ट्राच्या उन्नतीसाठी झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (PC : PTI)
सरदार पटेल यांच्या प्रेरणेने आज आपण प्रत्येक ध्येय गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. (PC : PTI)
प्रत्येकाने प्रयत्न केल्यास काहीही अशक्य नाही हे भारताने गेल्या नऊ वर्षांत सिद्ध केले आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. (PC : PTI)
देशाच्या एकात्मतेत आणि आपल्या विकासाच्या वाटचालीत राजकारण हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. (PC : PTI)
लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली वाहिली. (PC : PTI)
पंतप्रधानांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं की, देशवासियांनी आपल्या एकतेवर आघात करणाऱ्यांपासून सावध राहावे लागेल. (PC : PTI)
ज्यांना सकारात्मक राजकारण करता येत नाही ते देशाची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत जनमताची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं आहे. (PC : PTI)
दरम्यान, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यासाठी सुमारे 2989 कोटी रुपये खर्च आला आहे. येथे आतापर्यंत 1.53 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे.