PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत मोठं अपडेट, असं चेक करा स्टेटस
PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment : पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक केली जाते. डिसेंबर 2018 मध्ये सुरु झालेल्या या योजनाचा दहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डिसेंबर महिन्यात केंद्र सरकार दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिसेंबर महिन्यात केंद्र सरकार दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा दहावा हप्ता 15 डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला नवव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर नवव्या आणि दहाव्या हप्त्याचे पैसे एकत्रच म्हणजेच 4000 हजार रुपये जमा होऊ शकतात. जर तुम्ही केलेल्या अर्जात चुका असतील तर मात्र तुमचे पैसे अडकून राहण्याची भीती आहे.
PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.