Photo: ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार
ईलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटरने अॅंड्रॉईड (Android) साठी ट्विटर ब्लू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शनची किंमत जाहीर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅंड्रॉईड वापरकर्त्यांसाठी आता त्यासाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
ही किंमत iOS सदस्यांसाठी समान आहे. मासिक शुल्काच्या तुलनेत ट्विटरकडून वेब वापरकर्त्यांसाठी मात्र स्वस्त वार्षिक योजना जाहीर करण्यात आली आहे.
गुगलच्या (Google) अॅंड्रॉईड (Android) यूजर्ससाठी सबस्किप्शनची किंमत आणि अॅपलच्या (Apple) iOS यूजर्ससाठीची किंमत समान असेल.
राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना ट्विटरकडून ब्लू टिक देण्यात येते. पूर्वी ही सेवा विनामूल्य होती.
ईलॉन मस्कने ट्विटरची मालकी घेतल्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन फी आकारण्याची घोषणा मस्क यांनी केली होती.
आता ब्लू टिकसाठी महिन्याला 11 डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 900 रुपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटरचे आर्थिक व्यवस्थापन बिघडत चालल्याचं चित्र होतं.
इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर ट्विटरवर जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली.
त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिक ज्यांना देण्यात आली आहे त्यांच्याकडून फी आकारण्याचा निर्णय घेतला.