देशातील पहिला 'व्हर्टिकल सी लिफ्ट ब्रीज' पाहिलात का?
पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. (PHOTO - PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपांबन पूलचा काम जोरात सुरु आहे. लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु होईल... (PHOTO - PTI)
सध्या अनेकजन पूल पाहण्यासाठी येथे येतात. (PHOTO - PTI)
तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम आणि रामेश्वराम या दोन गावांना जोडणारा पुल 1914 साली सुरु झाला होता. (PHOTO - PTI)
1964 साली रामेश्वरम चक्रीवादळात या पुलाचे नुकसान देखील झाले होते व नंतर 2018 साली पुलाच्या काही भागात पुन्हा तडे गेल्याने तो बंद करण्यात आला होता. तत्त्कालीन रेल्व मंत्री पीयूष गोयल यांनी नव्या पुलाची घोषणा करत बांधकामासाठी 250 कोटी जाहीर केले होते.(PHOTO - PTI)
या पुलाची लांबी 2.5 किलोमिटर असेल व हा देशातील पहिला 'व्हर्टीकल लिफ्ट सी-ब्रिज' असेल. (PHOTO - PTI)
जुन्या पुलाचा तुलनेत नवा पूल तीन मीटर उंच असेल व समुद्राहुन 22 मिटर उंचीवर असेल. (PHOTO - PTI)
पुलाचा 63-मीटरचा मध्यभाग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर उचलता येणार आहे जेणेकरून जहाजांना त्याखालून सहजपणे जाता येईल (PHOTO - PTI)
सध्या पुलाचं काम जोरदार सुरू आहे. (PHOTO - PTI)
नवीन होणारा पामबन पुल हा विस्मयकारक इंजिनियरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. रामेश्वरम व धनुषकोडी आधीच नामांकीत पर्यटन स्थळं आहेत आणि या भव्य-दिव्य पुलामुळे तामिळनाडूच्या पर्यटनाला अजून गती मिळण्याची शक्यता आहे. (PHOTO - PTI)