India Pakistan War: राष्ट्रप्रथम! सुट्टी रद्द होताच जवान पुन्हा कर्तव्यपथावर तैनात; परभणीच्या गावकऱ्यांची निरोपासाठी गर्दी

सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असल्याने आणि जवानांच्या सुट्ट्या रद्द झाल्यामुळे परभणीचे 3 जवान तातडीने सीमेकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्या निरोपासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली.

India Pakistan War

1/6
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, परभणी जिल्ह्यातील जवान आपल्या कर्तव्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
2/6
सुट्ट्या रद्द झाल्यामुळे आज (11 मे 2025) परभणीचे 3 जवान तातडीने सीमेकडे रवाना झाले.
3/6
काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये कर्तव्यात असलेले रणजीत पवार, इसार येतील सीमेवर असलेले रोहिदास नाईक राठोड, पठाणकोठ येथील सय्यद फिरोज सय्यद मुसा हे 3 जवान आज रवाना झाले आहेत.
4/6
भारतमातेच्या या वीर जवानांना निरोप देण्यासाठी आज परभणी रेल्वे स्टेशनवर त्यांच्या गावकऱ्यांसह परभणीकरांनी मोठी गर्दी केली होती.
5/6
या वेळी जवानांचे कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
6/6
भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती दिली.
Sponsored Links by Taboola