India Vs Pakistan: पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन

India Vs Pakistan LOC: भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पाकिस्तानने नवीन योजना आखली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले बोगदे तयार केले जात आहेत.

India vs Pakistan War

1/9
भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर नाचक्की होऊनही पाकिस्तानची मस्ती अजून कमी झालेली नाही. पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी गट यांच्या कारवाया पुन्हा वाढत असून नियंत्रण रेषेवर (LOC) बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा नापाक कट आखला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
2/9
पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने दहशतवद्यांनी एलओसीखाली अत्याधुनिक भूमिगत मार्ग तयार केले आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी या मार्गांचा वापर होतो.
3/9
पाकिस्तानने खणलेले बहुतांश बोगदे हे जम्मूच्या सपाट भागात, नदीच्या खोऱ्यात आहेत. तेथे दहशतवाद्यांसाठी माती खोदणे सोपे आहे.
4/9
काही बोगदे अर्धा किलोमीटर लांब आणि 30 मीटर खोलवर पसरलेले आहेत. या बोगद्यांमध्ये प्रगत ऑक्सिजन प्रणाली असल्याची माहिती समोर आली आहे. या बोगद्यांचे दुसरे टोक थेट पाकिस्तानातील लष्करी चौक्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आढळले आहे.
5/9
सुरक्षा संस्थांच्या अहवालानुसार नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी एकत्र मिळून बोगदे तयार करण्याचे काम करत आहेत. पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सनाही भेटल्याची माहिती समोर आली आहे.
6/9
सध्या पाकिस्तानकडून सीमारेषेच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर बोगदे खणले जात आहेत. भारतीय सैन्याने आतापर्यंत 24 पेक्षा जास्त बोगदे शोधून काढले आहेत.
7/9
2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. तसचे 2016 साली दहशतवाद्यांनी नागरोटा येथील भारतीय सैन्याच्या छावणीवर हल्ला केला होता. त्यावेळी दहशतवादी जमिनीखालील बोगद्यांमधून भारतात शिरले होते.
8/9
पाकिस्तानने खणलेले बोगदे शोधून काढण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भेदक रडारने सुसज्ज असलेले ड्रोन्स जमिनीच्या आतमध्ये लपलेल्या संरचना शोधून काढतात.
9/9
भूकंपीय सेन्सर्स खोदकामातून होणाऱ्या कंपनांची नोंद ठेवतात. तर उपग्रहांकडून मिळणाऱ्या हाय रिझोल्यूशन छायाचित्रांचा वापर करुन हे बोगदे शोधले जात आहेत. याशिवाय, भारतीय सैन्याकडून हे बोगदे शोधायला टनेल रॅटचा वापर केला जातो.
Sponsored Links by Taboola