Jallianwala Bagh Photos: जालियनवाला बाग स्मारकाचा चेहरामोहरा बदलला, पहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी 6:25 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जालियनवाला बाग स्मारकाचे नूतनीकरण केलेले कॉम्प्लेक्स राष्ट्राला समर्पित केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबऱ्याच काळापासून पडून असलेल्या आणि वापरात नसलेल्या इमारतींचा योग्य पुनर्वापर सुनिश्चित करण्यासाठी चार संग्रहालय गॅलरी तयार करण्यात आल्या आहेत.
या गॅलरी त्या काळात पंजाबमध्ये घडलेल्या विविध घटनांचे विशेष ऐतिहासिक महत्त्व दर्शवतात.
या घटनांचे प्रदर्शन दाखवण्यासाठी ऑडिओ, व्हिडीओ तंत्रज्ञानाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे, ज्यात मॅपिंग आणि 3 डी चित्रण तसेच कला आणि शिल्प स्थापनेचा समावेश आहे.
या कॅम्पसमध्ये अनेक विकासात्मक उपक्रम घेण्यात आले आहेत. पंजाबच्या स्थानिक स्थापत्यशैलीनुसार वारसाशी संबंधित सविस्तर पुनर्बांधणीची कामे करण्यात आली आहेत.
शहीदी विहिरीची दुरुस्ती आणि नव्याने विकसित केलेल्या उत्कृष्ट संरचनेसह पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या बागेचे मध्यवर्ती ठिकाण मानले जाणारे 'ज्वाला स्मारक'चे नूतनीकरण तसेच दुरुस्ती करण्यात आली आहे, येथे असलेल्या तलावाचा 'लिली तलाव' म्हणून पुनर्विकास करण्यात आला आहे, आणि लोकांना येण्याजाण्यासाठी रस्ते रुंद करण्यात आले आहेत.
लोकांना मार्गदर्शनासाठी योग्य निर्देशकांसह नवीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी रोषणाई करण्यात आलीय. सुधारित लँडस्केप आणि रॉक फॉर्मेशन हे स्थानिक वृक्षारोपणाने केले गेले आहेत.
संपूर्ण बागेत ऑडिओ नोड्स लावले आहे. याशिवाय, मोक्ष स्थळ, अमर ज्योत आणि ध्वज मस्तूलसह अनेक नवीन क्षेत्रे विकसित केली गेली आहेत.