अनेक दिवसांपासूनचा संघर्ष अखेर थांबला.. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
1/6
दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे.
2/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला. पासवान यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे."
3/6
राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं की, रामविलास पासवान यांच्या निधनाची बातमी ऐकूण दु:ख झाले आहे. गरीब-दलित वर्गाने राजकीय बुलंद आवाज गमावला आहे.
4/6
मागील अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आजारी होते.
5/6
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
6/6
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. "पप्पा... तुम्ही या जगात नाहीत पण मला माहित आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात' असं ट्वीट चिराग पासवान यांनी केलं.
Published at :
= 6">