Indian Railway : भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे प्रवास करायचा आहे? जाणून घ्या खास रेल्वे मार्गांबद्दल
Continues below advertisement
Indian Railway : भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे प्रवास करायचा आहे? जाणून घ्या खास रेल्वे मार्गांबद्दल
Continues below advertisement
1/6
रेल्वे ही भारतीयांसाठी लाइफलाइन असल्याचे म्हटले जाते. जगातील चौथा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे भारतात आहे. भारतातील काही रेल्वे मार्ग अतिशय मोठे आहेत. काही ठिकाणी प्रवासासाठी तब्बल 80 तासांचा वेळ लागतो. जाणून घेऊयात भारतातील या सर्वाधिक लांबीच्या रेल्वे मार्गांबद्दल (PC: Freepik)
2/6
आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारीला जाणारी विवेक एक्सप्रेसही भारतातील सर्वाधिक लांबीचा पल्ला गाठणाऱ्या एक्स्प्रेसपैकी एक आहे. ही विवेक एक्स्प्रेस 30 स्थानकांवर थांबते आणि 4273 किलोमीटरचा प्रवास करते. या प्रवासासाठी 80 तासांचा वेळ लागतो. (PC: Freepik)
3/6
हिमसागर एक्स्प्रेस ही कन्याकुमारी पासून ते श्री माता वैष्णोदेवी कटरा या मार्गादरम्यान धावते. ही एक्स्प्रेस 12 राज्यांमधून धावते. जवळपास 3785 किलोमीटर इतके अंतर ही एक्स्प्रेस कापते. या प्रवासासाठी 73 तासांचा वेळ लागतो. (PC: Freepik)
4/6
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम ते आसाममधील सिलचर पर्यंत धावणारी तिरुवनंतपुरम-सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन 54 स्थानकांवर थांबा घेते. ही एक्स्प्रेस 3932 किमीचे अंतर कापते. या ट्रेनला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी 76 तास 35 मिनिटांचा वेळ लागतो. (PC: Pixabay)
5/6
अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस ही पंजाबमधील अमृतसर ते केरळमधील कोचुवेली-तिरुअनंतपुरम अशी धावणारी साप्ताहिक ट्रेन आहे. ही ट्रेन एकूण 3597 किलोमीटरचे अंतर कापते आणि 57 तासांत प्रवास पूर्ण करते. ही ट्रेन एकूण 7 राज्यांमधून प्रवास करते. (PC: Pixabay)
Continues below advertisement
6/6
त्रिपुरातील आगरतळा येथून बेंगळुरूमधील कँटामेंट दरम्यान धावणारी हमसफर एक्स्प्रेस एकूण 3570 किलोमीटरचा प्रवास करते. ही एक्स्प्रेस आठवड्यातून मंगळवारी आणि शनिवारी धावते. ही एक्स्प्रेस 28 स्थानकांवर थांबते. या ट्रेनला प्रवासासाठी 64 तासांचा वेळ लागतो. (PC: Freepik)
Published at : 31 May 2022 03:58 PM (IST)