Jyoti Malhotra: भारतीय ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळख; आता ISI च्या संपर्कात असल्याचा संशय, कोण आहे ज्योती मल्होत्रा?

Who Is Jyoti Malhotra: ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडल्याचे समोर आले आहे.

Jyoti Malhotra

1/11
Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा पाकच्या आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केलाय जात आहे.
2/11
दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी ज्योतीच्या फोनमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडल्याचे समोर आले आहे.
3/11
पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा अधिकारी दानिशनं ज्योतीची आणखी दोघांशी ओळख करून दिली. या तिघांशीही ज्योतीचे चांगले संबंध होते.
4/11
पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची नजर असते. व्हिसा मिळवतानाच ज्योतीचा आयएसआयशी संबंध आल्याची माहिती आहे.
5/11
ज्योती चार वेळा पाकिस्तानमध्ये गेली यावेळी ती कोणाकोणाला भेटली, एसआयला गोपनीय माहिती पुरवण्यामध्ये तिच्यासोबत आणखी कोण कोण सामील आहे ? यासंदर्भात तिला विचारणा करण्यात येतेय. त्यामुळे या चौकशीदरम्यान आणखी काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
6/11
ज्योती मल्होत्रा ही एक भारतीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे.
7/11
ज्योतीने आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली. नंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि "Travel with Jo" या युट्यूब चॅनेलवर विविध देशांतील प्रवासाचे व्हिडीओ शेअर करू लागली.
8/11
ज्योतीच्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती आणि त्या देशाच्या बाजूने विचार मांडले जात होते. या माध्यमातून तीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.
9/11
ज्योतीच्या युट्यूब चॅनेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची चौकशी सुरू आहे.
10/11
अहवालानुसार, ज्योतीची एकूण संपत्ती लाखो रुपयांमध्ये असून, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे.
11/11
ज्योतीच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.
Sponsored Links by Taboola