Jagannatha RathaJatra 2021 : पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षी भाविकांविना यात्रा- पाहा फोटो
आज 12 जुलै, सोमवारी जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. ओडिसातील पुरीमध्ये ही यात्रा निघते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना महामारीमुळं सुप्रीम कोर्टाचा आदेशानुसार मर्यादित लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा होत आहे.
सुप्रीम कोर्टानं ओडिसा सरकारच्या निर्णयाचं समर्थन करत पूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यावर बंदी घातली होती.
मागील वर्षी देखील कोरोनामुळं सर्व नियमांचं पालन करतच यात्रा काढण्यात आली होती.
यंदाही पुरी येथील जगन्नाथ यात्रेवरही कोरोनाचे सावट घोंगावत आहे. मात्र सर्व पूजाविधी परंपरेप्रमाणे होत आहेत.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितियेला ही रथयात्रा होते.
भारतावरील परकीय आक्रमणांमुळे जगन्नाथ मंदिर परिसर सुमारे 144 वर्षे बंद होते. दररोजचे पूजनही बंद होते. मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली
मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली.
या यात्रेला लाखो भाविक देशभरातून येत असतात. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामुळं भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
यंदा रथ यात्रेदरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य कोरोना प्रोटोकॉलचं कडक पालन करण्यात येत आहे.