LoC Covid Vaccination: कडाक्याच्या थंडीत बारामुल्लासह जम्मू आणि काश्मीरमध्ये लसीकरण
प्रचंड थंडी, बर्फवृष्टी, बर्फाने भरलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आरोग्य कर्मचारी खेड्यांमध्ये जाऊन लसीकरण करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएएनआय या वृत्तसंस्थेने नुकतेच या बर्फाळ प्रदेशात सुरू असलेल्या लसीकरणाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये हाडं गोठवणारी थंडी असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केले जात आहे.
जम्मू काश्मीरच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या जवानांच्या मदतीने बर्फवृष्टी असतानाही शनिवारी बारामुल्लाच्या बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील गावांमधील नागरिकांचे लसीकरण केले.
ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. परवेझ मसूदी यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने बारामुल्ला येथील बोनियार येथे नियंत्रण रेषेजवळील भागात लसीकरण मोहीम राबविणाऱ्या आरोग्य पथकांना मदत केली. येथील 15 ते 18 वयोगटातील मुले आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना लस देण्यात आली.
सतत होणारी बर्फवृष्टी आणि वाढलेल्या थंडीच्या कडाक्यातही लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे.
एएनआयने या वत्तसंस्थनेने लसीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.