IT Raid on Dhiraj Prasad Sahu: 3 बँकांचे कर्मचारी अन् 40 मशिन्सही थकल्या; धीरज साहूंच्या घरी सापडलेल्या नोटा मोजता मोजता आयकर विभागाच्या नाकी नऊ
IT Raid on Dhiraj Prasad Sahu: खासदार धीरज प्रसाद साहू आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापे टाकून कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, रोख मोजणीसाठी आणखी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता आणखी म्हणजे किती कर्मचारी असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल... तब्बल तीन बँकांचे कर्मचारी आयकर विभागाच्या छापेमारीत जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्यासाठी जुंपले आहेत.
आयकर विभागानं झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर छापा टाकून आतापर्यंत 353 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागानं आणखी 40 नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत. तसेच, 3 बँकांच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे.
6 डिसेंबर रोजी धीरज साहू यांच्या घरावर छापा टाकल्यापासूनच रोख रक्कम जप्त करण्याचं सत्र सुरू झालं. त्यानंतर जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्यात कर्मचारी आणि मशीन दोघांचीही कसोटी लागली.
अनेक नोटा मोजण्याच्या मशीन तर थेट बंद पडल्या पण रोकड काही संपली नाही. अजुनही छापेमारीत जप्त करण्यात आलेली रक्कम मोजण्याचं काम सुरूच आहे.
खासदार धीरज प्रसाद साहू हे झारखंडमधील प्रमुख व्यावसायिक आणि राजकीय वारसा असलेलं व्यक्तिमत्त्व आहे. ईडीनं धीरज साहू यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या घरांवर, मालमत्तांवर छापेमारी केली आहे. ईडीनं ओदिशातील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड (बीडीपीएल) च्या परिसर आणि बंगालमधील काही ठिकाणीही छापे टाकले आहेत.
राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्यानंतर भाजपनं त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसचा याच्याशी काहीही संबंध नाही.