PHOTO : भारतीय रेल्वेचं मातांसाठी खास 'बेबी बर्थ'चं गिफ्ट
नवजात बालकांसह ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना भारतीय रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. मातांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने ट्रेनमध्ये बेबी बर्थ सुरु केले आहेत. मात्र, सध्या तरी त्यांची चाचणी सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली विभागातील उत्तर रेल्वेने निवडक गाड्यांमध्ये चाचणी म्हणून 'बेबी बर्थ' सुरु केला आहे, जेणेकरुन मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपता येईल.
उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाने बेबी बर्थ नावाचा हा विशेष उपक्रम हाती घेतला होता, ज्यामध्ये खालच्या बर्थसोबत एक छोटा बर्थ जोडला जाईल, जो बाळासाठी असेल. त्याला बेबी बर्थ म्हटलं जाईल.
ज्या महिला आपल्या मुलांसोबत प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा बर्थ फायदेशीर ठरेल. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मुलांना अतिरिक्त बर्थमध्ये झोपवून याचा फायदा घेता येईल. लहान मूल झोपेत असताना खाली पडू नये म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वे बर्थच्या बाजूला स्टॉपर देखील देण्यात आलं आहे.
हा उपक्रम मातृदिनासाठी समर्पित केला. प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रम म्हणून, लखनौ मेलच्या कोच क्रमांक 194129/B4 मध्ये बर्थ क्रमांक 12 आणि 60 मध्ये बेबी बर्थ सुरु करण्यात आला आहे, जेणेकरून आई आपल्या मुलासोबत आरामात प्रवास करु शकेल.
मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या बेबी बर्थमध्ये घेण्यात आली आहे. ही सीट फोल्डेबल असून स्टॉपरने सुरक्षित आहे.