Indian Railway: जनरल डब्यात जागा नसेल तर स्लीपर क्लासमधून प्रवास करता येतो का?
देशात वाहतुकीचे स्वस्त साधन असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे. रेल्वे प्रवास करताना गर्दी असल्याचं नेहमीचं चित्र आहे. अनेक वेळा रेल्वेचा जनरल डब्बा इतका भरलेला असतो की त्यात पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत आपण द्वितीय श्रेणीच्या जनरल तिकिटाच्या आधारे इतर कोणत्याही बोगीमध्ये म्हणजे आरक्षित वर्गाच्या स्लीपर क्लासच्या बोगीतून प्रवास करू शकते का? याबाबत रेल्वेचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.
रेल्वे कायदा, 1989 अंतर्गत द्वितीय श्रेणीच्या तिकिटाची वैधता किती असेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे. या नियमांनुसार, जर तुमचा प्रवास 199 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तिकीटाची वैधता तीन तास आहे आणि जर यापेक्षा जास्त अंतर असेल तर ते 24 तास आहे.
जर तुमच्याकडे सेकंड क्लासचे तिकीट असेल आणि जनरल डब्यात पाय ठेवायलाही जागा नसेल, तर रेल्वे कायद्यानुसार तुम्हाला पुढची ट्रेन येईपर्यंत थांबावे लागते. कारण हे तिकीट प्रवासासाठी आहे, कोणत्याही विशिष्ट ट्रेनसाठी आरक्षित नाही.
तिकिटाच्या वैधतेच्या मर्यादेत इतर कोणत्याही ट्रेनचा पर्याय नसल्यास, तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकता. परंतु येथे तुम्हाला कोणत्याही रिकाम्या सीटवर बसण्याचा अधिकार नाही.
रेल्वे कायद्याच्या कलम 138 अन्वये, तुम्ही ट्रेनमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम तुम्हाला टीसीसोबत संपर्क करावा लागेल. तुम्ही कोणत्या परिस्थितीत स्लीपर क्लासमध्ये प्रवेश केला आहे हे त्याला सांगावं लागेल.
कोणतीही जागा रिक्त असल्यास, टीसी तुमच्याकडून दोन्ही वर्गांच्या प्रवासाच्या तिकिटांचा फरक घेऊन तुम्हाला स्लीपर क्लासचे तिकीट देईल. कोणतीही सीट रिकामी नसल्यास पुढील स्थानकापर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
यानंतरही तुम्ही स्लीपर क्लासमधून बाहेर न पडल्यास 250 रुपये दंड भरून प्रवास सुरू ठेवू शकता. तुमच्याकडे 250 रुपये नसल्यास टीसी तुमचे चलान तयार करेल, ते तुम्हाला नंतर न्यायालयात सादर करावं लागेल.
विशेष म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जनरल डब्यात जाण्यास वाव मिळत नाही, तोपर्यंत कोणीही तुम्हाला ट्रेनमधून खाली ढकलून देऊ शकत नाही. जर तुम्ही दंड भरण्यास असमर्थ असला तरी तुमचे सामान कोणीही जप्त करू शकत नाही.