Weather : पुढच्या दोन दिवसात उत्तर भारतात पावसाची शक्यता
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कठे उन्हाचा कडाका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतात (North india) सध्या तापमानात वाढ झाली असून, त्याचा परिणाम म्हणून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढच्या एक ते दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून (27 एप्रिल) दिल्ली आणि परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं तापमानात घट होणार आहे.
पुढील तीन दिवसात पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुढील एक ते दोन दिवस उत्तर-पश्चिम आणि पश्चिम भारतात कोणताही बदल दिसण्याची शक्यता नाही. बिहार, यूपी, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये यावेळी उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.
आज (25 एप्रिल) नवी दिल्लीत किमान तापमान 22 आणि कमाल 35 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. त्याच वेळी, 26 ते 27 एप्रिल दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
25 ते 27 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 35 ते 38 अंशांच्या दरम्यान नोंदवले जाऊ शकते. त्याच वेळी, 28 आणि 29 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय उत्तराखंडमधील रुद्रप्रयागच्या डोंगरावरही बर्फवृष्टी झाली आहे.