Glass Igloo : चहूकडे बर्फाची चादर... अन् निसर्गाचा सहवास, ग्लास इग्लू ठरतंय पर्यटकांचं आकर्षण
Glass Igloo Restaurant in India : काश्मीरमधील गुलमर्गच्या जगप्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन आकर्षण तयार करण्यात आले आहे. (PC : KolahoiPanorama/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट गुलमर्ग उभारण्यात आलं आहे. हे अनोखं रेस्टारंट सध्या चर्चेचा विषय आहे. (PC : KolahoiPanorama/instagram)
गुलमर्गमध्ये काचेचा इग्लू बांधण्यात आला आहे. हा इग्लू ओपन एअर रेस्टॉरंटचा एक भाग आहे. (PC : KolahoiPanorama/instagram)
ग्लास इग्लू म्हणजेच काचेचा इग्लू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. (PC : KolahoiPanorama/instagram)
बर्फाच्छादित परिसर आणि पर्वतरांगांवरील बर्फाची चादर या निसर्ग सौंदर्याचा आनंद तुम्हाला येथे मिळेल. (PC : KolahoiPanorama/instagram)
पर्यटक या ग्लास इग्लूचं कौतुक करताना थकत नाहीत. निसर्ग सौंदर्याचा आनंदे घेत तुम्ही येथे आरामदायी प्रकारे चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतात. (PC : KolahoiPanorama/instagram)
या अनोख्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येत दाखल होत आहेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.(PC : KolahoiPanorama/instagram)
गुलमर्गमधील एका खाजगी हॉटेल मालकाने हे काचेच्या इग्सूचं रेस्टॉरंट तयार केलं आहे. पर्यटकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी एक अप्रतिम ग्लास इग्लू रेस्टॉरंट बांधण्यात आलं आहे.(PC : KolahoiPanorama/instagram)
हॉटेलचे व्यवस्थापक हमीद मसूदी यांनी सांगितले की, हॉटेलच्या अंगणात तीन ग्लास इग्लू तयार करण्यात आले आहेत. हा ओपन हॉटेलचा भाग आहे.
आता नव्याने तयार करण्यात आलेल्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या संकल्पनेच्या नाविन्यपूर्णतेचे कौतुक केले आहे. येथील सुंदर वातावरणात जेवणाचा आनंद घेतल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. (PC : KolahoiPanorama/instagram)
एका पर्यटकाने येथील अनुभवाचं वर्णन करताना सांगितलं की, 'निसर्गाच्या इतक्या जवळ असलेल्या अशा ठिकाणी बसण्याचा विचार मी कधीच केला नाही.' (PC : KolahoiPanorama/instagram)