Coronavirus : काळजी घ्या! पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, एका दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण
देशात एका दिवसांत एक हजारहून अधिक नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 129 दिवसांनंतर देशात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1071 नवीन रुग्ण सापडले आहे. दरम्यान, यातील सुमारे 200 हून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.
भारतात 129 दिवसांनंतर एका दिवसात 1,000 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 5,915 असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील 24 तासांत एकूण 1,071 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र, केरळ आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,30,802 झाली आहे.
देशात नव्याने सापडलेल्या कोरोना रुग्णांपैकी 236 रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात सध्या 1308 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
आरोग्य विभागाकडून सर्व प्रकरणांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारनेही राज्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,46,95,420 इतकी झाली आहे. एकूण रुग्णांपैकी सध्या 0.01 टक्के रुग्ण सक्रिय आहेत.