Coronavirus : संसर्ग कमी मात्र धोका कायम; देशात 1946 सक्रिय रुग्ण, सध्याची परिस्थिती काय?
देशात गेल्या 24 तासांत 145 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या देशात 1946 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर उपचाराधीन रुग्णांमध्ये 16 रुग्णांची घट झाली आहे.
कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात 4,46,81,650 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली असून एकूण 5,30,728 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशव्यापी कोरोना लसीकरणात 220 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. सरकार सध्या कोविड चाचण्या आणि लसीकरणावर अधिक भर देत आहे.
आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना लसीकरणासाठी आणि बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.
दरम्यान, जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंताजनक बाब आहे.
जगभरात कहर माजवणाऱ्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. याशिवाय BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत.
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर कोविड चाचणी करण्यात येत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहता खबरदारी म्हणून ही पाऊले उचलली जात आहेत.
कोरोना रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.