भारतीय हवाई दलाचा फ्रान्ससोबत लष्करी सराव; राफेलमधून उंच आकाशात Air Exercise
Garuda VII : भारतीय हवाई दलाचे (IAF) चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Marshal V R Chaudhari) यांनी फ्रान्ससोबतच्या लष्करी सराव दरम्यान राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. यावेळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि फ्रान्समधील संरक्षण आणि द्विपक्षीय संबंध प्रदर्शित करताना, भारतीय हवाई दल (IAF) चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी राफेल या लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सराव मंगळवारी जोधपूर येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये फ्रान्सचे हवाई प्रमुख जनरल स्टीफन मिल यांनी भारतीय-रशियन वंशाच्या IAF Su-30MKI लढाऊ विमान 'गरुड'मधून उड्डाण केलं.
FASF प्रमुखांसह प्रसारमाध्यमांशी बोलताना चौधरी यांनी माहिती दिली की, गरुड दोन्ही हवाई दलांना ऑपरेशन्स दरम्यान एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती शिकण्याची आणि आत्मसात करण्याची अनोखी संधी उपलब्ध करुन देत आहे.
चौधरी यांनी 2003 पासून नियमित द्विपक्षीय सरावासह प्रत्येक आवृत्तीत विकसित होत असलेल्या भारत आणि फ्रान्स या दोन हवाई दलांमधील वाढत्या परस्पर कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला.
फ्रान्स हवाई दलाचे प्रमुख जनरल स्टेफन मिल यांनी सोमवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि नौदलाचे उपप्रमुख अॅडमिरल एसएन घोरमाडे यांचीही भेट घेतली.
गरुड VII LCA तेजस आणि अलीकडेच सामील झालेले LCH प्रचंड यांची आंतरराष्ट्रीय सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सरावात चार FASF राफेल लढाऊ विमानं आणि एक A-330 मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमानांचाही सहभाग आहे.
LCA आणि LCH व्यतिरिक्त, IAF दलात Su-30 MKI, राफेल आणि जॅग्वार लढाऊ विमानं, तसेच Mi-17 हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.
IAF दलामध्ये फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, AWACS, AEW&C आणि गरुड स्पेशल फोर्सेस यांसारख्या कॉम्बॅट एनेबलिंग एसेट्सचाही समावेश आहे.