Mobile Use: मोबाईलवर वेळ घालवण्यात भारतीयांचा क्रमांक कितवा?
मोबाईलनं अनेकांचं जीवन बदलून टाकलंय. मोबाईल हा बहुतेक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचॅटिंग, कॉलिंग आणि इतर महत्वाच्या कामांसह मोबाईल मनोरंजनाचादेखील साधन बनत चाललंय. घरात असो किंवा बाहेर बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरताना आपणांस दिसतात.
का अहवालानुसार, कोणत्या देशात मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जातोय? हे सांगितलं गेलंय. या यादीत इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे. तर, भारताचा क्रमांक कितवा? हे जाणून घेऊयात.
इंडोनेशियातील लोक दररोज 5.5 तास मोबाईलवर वेळ घालवतात. मोबाईलवर वेळ घालवण्यात इंडोनेशिया अव्वल क्रमांकावर आहे.
त्यानंतर ब्राझील 5.4 तासासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
दक्षिण कोरियात लोक 5 तास मोबाईवर वेळ घालवतात.
यानंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात 4.8 तास लोक मोबाईलवर वेळ घालवतात.