In Pics : NDA ची 140 वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज; अशी होती पासिंग आऊट परेड
देशसेवेत रुजू होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यापैकी काहींना हे स्वप्न साकार करण्याची संधीही मिळते. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशाच या संधीचं सोनं करणारी कॅडेट्सची एक तुकडी त्यांच्या पुढच्या प्रवासास सज्ज झाली आहे. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
राष्ट्रीय संरक्षण अकादमी, अर्थात एनडीएतून 140 वी तुकडी उत्तीर्ण झाली असून, देशसेवेत रुजू होण्यास सज्ज झाली आहे. या तुकडीची पासिंग आऊट परेड नुकतीच पार पडली. यापूर्वी हबीबुल्लाह सभागृह येथे विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा पार पडला. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
एनडीएतून विद्यार्थ्यांच्या पदवीदान सोहळ्यासाठी लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांची मुख्य उपस्थिती होती. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
140 व्या तुकडीतील हे सर्व विद्यार्थी येत्या काळात देशसेवेसाठी सज्ज होणार असून विविध स्तरांवर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
पासिंग आऊट परेड हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, या टप्प्यानंतरच हे सर्व कॅडेट अधिकृतपणे भारतीय संरक्षण दलाचा भाग होतात. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
सूत्रांच्या माहितीनुसार बीटेक क्षेत्रातील 44 नौदल कॅडेट आणि 52 वायुदलाचे कॅडेट्सनीही आपलं प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केलं. (छाया सौजन्य- व्हिडीओ स्क्रीनग्रॅब/ Defence Direct Education / युट्यूब)
सध्या सोशल मीडियावर या संबंधीची अनेक छायाचित्र व्हायरल होत आहेत. त्यापैकीच एक छायाचित्र असं आहे जिथे, भारतीय नौदलातील चीफ ऑफ नेवल स्टाफ, अॅडिमिरल करमबीर सिंह यांनी अकादमीच्या परिसरात नव्या जोमाच्या कॅडेट्ससह पुश- अप्सही केले. (छाया सौजन्य- @proudhampur/ ट्विटर)