H3N2 Virus : काळजी घ्या! H3N2 इन्फ्लुएंझाचा वाढता प्रसार, रुग्णांमध्ये वाढ सुरुच
H3N2 Influenza Virus Cases in India : सध्या देशात H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (PC : istock)

H3N2 Influenza Virus Updates in India
1/8
व्हायरल इन्फ्लूएंझा (Influenza) म्हणजेच H3N2 विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. देशातील व्हायरल फ्लूच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. (PC : istock)
2/8
सर्दी, तापामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णांना H3N2 ची लागण झाल्यास त्यांना श्वसनात अडथळे येत आहेत. (PC : istock)
3/8
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना काळजी घेण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. (PC : istock)
4/8
भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. H3N2 इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. (PC : istock)
5/8
सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. (PC : istock)
6/8
H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणूचा (H3N2 Virus) वेगाने पसरत आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. (PC : istock)
7/8
देशात व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुद्दुचेरीमध्ये H3N2 इन्फ्लुएंझाची लागण झालेल्या 70 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. (PC : istock)
8/8
या विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकार अलर्ट मोडमध्ये आलं आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (PC : istock)
Published at : 13 Mar 2023 02:20 PM (IST)