Gujrat Cloudburst : गुजरातमध्ये पावसाचं तांडव! जुनागड परिसर पाण्यात; जोरदार पावसात गुरं आणि गाड्या गेल्या वाहून, पाहा फोटो...
गुजरातमधील जुनागडमध्ये शनिवारी (22 जुलै) ढगफुटी झाली आणि सर्व उद्ध्वस्त झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्या आणि गुरं वाहून गेली. हवामान खात्याने 23 जुलैला देखील गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पावसामुळे अनेक घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी लोक कमरेभर पाण्यातून चालत होते.
देवभूमी द्वारका, भावनगर, भरूच, सुरत, तापी, वलसाड आणि अमरेली या जिल्ह्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला.
गुजरातच्या दक्षिणेकडील भाग आणि सौराष्ट्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणं आणि नद्यांमधील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे.
पावसामुळे राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.
हवामान खात्याने अहमदाबादसह सौराष्ट्र, दक्षिण आणि मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येथे अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.