भारतात उपासमारीची स्थिती चिंताजनक, ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर
आज ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताचा स्कोअर हा 28.7 टक्के आहे. यावेळी भारताची पाकिस्तानसह बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेनं बगल काढली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताची स्थिती बिकट झाली आहे. 125 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत 111 व्या स्थानावर आला आहे.
इतकेच नाही तर सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे प्रमाण तसेच बालकांच्या कुपोषणातही भारत आघाडीवर आहे. 2022 सालापासून भारताची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
गेल्या वर्षी भारत या निर्देशांकात 107 व्या क्रमांकावर होता. यावर्षी त्यामध्ये आणखी घसरण झाली असून, भारताची 111 व्या स्थानावर घसरण झाली आहे.
आज जाहीर झालेल्या या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा स्कोअर 28.7 टक्के आहे.
भारतात भूक आणि उपासमारीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठी एक साधन आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार, भारताच्या शेजारी असणाऱ्या इतर देशांवर नजर टाकली तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळचीही स्थिती चांगली आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये पाकिस्तान 102 व्या, बांगलादेश 81 व्या, नेपाळ 69 व्या आणि श्रीलंका 60 व्या क्रमांकावर आहे.