Ganeshotsav 2023: जन्माष्टमीआधीच गणेशोत्सवाची धूम; देशभरात तयारी सुरू, आगमन सोहळेही धडाक्यात, पाहा फोटो
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे आताच वातावरण प्रसन्नमय झालं आहे. मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तींना फायनल टच देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअगदी 200 रुपयांपासून मिळणाऱ्या गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
अनेक जण आपल्या घरातल्या बाप्पासाठी आताच बुकिंग करत आहेत.
अगदी गावपातळीवरही बाप्पांच्या आगमानाचा आनंद आहे. मूर्तीकार रंगरंगोटीमध्ये व्यस्त आहेत.
मुंबईत मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे.
लालबाग-परेल परिसरातील रस्ते गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यामुळे जॅम झाले आहेत.
शनिवार, रविवारी मोठ्या गणपतींचं आगमन होणार असल्याने लालबाग, परळ परिसरात गर्दी पाहायला मिळणार आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही इकोफ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती मिळत आहे.
इको फ्रेंडली मूर्तींना मागणी असल्याने अशाच मूर्ती घडवण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे.
अनेक ठिकाणी मूर्तींना फायनल फिनिशिंग देण्याचं काम सुरू आहे.