Republic Day : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकला
या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक तरूणांसह महिला आणि लहान मुले उपस्थित होते. भारत माता की जय ! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( photo credit - Twitter Basit Zargar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीनगर येथील लाल चौकातील घंटा घरावर तिरंगा फडकावला आहे. photo credit - Twitter Basit Zargar)
दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे आतापर्यंत श्रीनगर येथील लाला चौकातील घंटा घरावर कधीच तिरंगा फडकावला नाही. त्यामुळे आजचा दिवस हा ऐतिहासिक मानावा लागणार आहे.
कलम 370 हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे.
भारत माता की जय म्हणत मोठ्या उत्साहात लाल चौकातील घंटा घराच्या टॉपवर तिंरगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायलं.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाचा पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. photo credit - Twitter Basit Zargar)
श्रीनगरच्या शेर ए काश्मिर स्टेडिअममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. श्रीनगरसह संपूर्ण काश्मिरमध्ये सुरक्षा तैनात करण्यात आली आहे