15ऑगस्टला ध्वजारोहण करताय? हे नियम आधी जाणून घ्या!

भारतीय ध्वज हे आपल्या राष्ट्राचे सन्मान, एकता आणि अभिमानाचे प्रतीक आहे. चुकीच्या पद्धतीने ध्वज वापरणे किंवा फडकवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा ठरू शकतो.

Method and rules of flag hoisting

1/12
1. ध्वजाची रचना आणि रंगसंगती: ध्वज नेहमी आयताकृती असावा, लांबी-रुंदीचे प्रमाण 3:2 असावे.
2/12
वर केशरी , मधोमध पांढरा, खाली हिरवा रंग असतो.
3/12
पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे 24 आरी असलेले अशोक चक्र असते.
4/12
2. ध्वज फडकवण्याची पद्धत: 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) – ध्वज हळूहळू वर खेचून लगेच सोडला जातो आणि फडकवला जातो
5/12
26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) – आधीच बांधलेला ध्वज फडफडवून सोडला जातो
6/12
ध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवावा.ध्वज जमिनीला किंवा पाण्याला लागू नये.
7/12
3. ध्वजाचा सन्मान राखणे: ध्वज कधीही उलटा लावू नये.ध्वजावर काही लिहू नये किंवा चित्र काढू नये.
8/12
ध्वज फाटलेला, मळलेला किंवा रंग उडालेला असू नये.
9/12
ध्वजाचा वापर कपडे, सजावट, टेबलक्लॉथ किंवा पॅकेजिंगसाठी करू नये.
10/12
4. इतर महत्त्वाचे नियम: ध्वज नेहमी उजव्या बाजूला (मानाच्या स्थानी) असावा.
11/12
एका खांबावर एकावेळी फक्त एकच ध्वज असावा.ध्वज खाली उतरवताना हळूवारपणे खाली आणावा आणि व्यवस्थित दुमडावा.
12/12
टीप: 2002 पासून Flag Code of India मध्ये बदल होऊन नागरिकांना कोणत्याही दिवशी, घरात किंवा कार्यालयात ध्वज फडकवण्याची मुभा आहे. परंतु, योग्य सन्मान आणि नियम पाळणे बंधनकारक आहे.
Sponsored Links by Taboola