In Pics : ईद मुबारक! घरच्या घरीच राहून नागरिकांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
आज देशभरात ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. देशभरातून आणि जगभरातून या सणासाठी लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वेळची ईद ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन साजरी करण्यात यावी असं आवाहन देशभरातील प्रमुख मौलवींनी केलं आहे.
याच आवाहनाचं पालन करत नागरिकांनी घरच्या घरीच राहून ईद साजरा करण्याला प्राधान्य दिलं.
अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे नागरिकांनी मशिदीमध्ये न जाता आप्तेष्टांसहच त्यांनी खास क्षण व्यतीत केले.
ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा शेवट या ईदने होतो. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकमेकांसाठी प्रार्थना करतात.