आनंदाची बातमी! 'या' भागात झालं मान्सूनच आगमन
मान्सूनसंदर्भात (Mansoon) आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे.
आहे. 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील आठवडाभर म्हणजे रविवार 26 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
23 मे पासून तर दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या 8 जिल्ह्यात अवकाळीची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
अंदमान निकोबार व केरळात मान्सून पोहोचण्यासाठीची आवश्यक स्थिती तयार झालीय. पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी अगोदरच सुरु झाली आहे.
मान्सून आगमनासाठी 10 मे पासूनच पूरक गोष्टी घडत आहेत. त्यामुळं मान्सून वेळेच्या आधीच केरळात पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.