Delhi Bomb Blast News: 32 गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचे हात-पाय उडाले, मृतदेह छिन्नविछिन्न; दिल्ली स्फोटातील थरकाप उडवणारे 10 फोटो

Delhi Bomb Blast News: दिल्लीतील स्फोटामुळे काल सकाळीच फरीदाबादमध्ये झालेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. काल फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

Continues below advertisement

Delhi Bomb Blast News

Continues below advertisement
1/10
Delhi Bomb Blast News: देशाची राजधानी दिल्ली काल (10 नोव्हेंबर) स्फोटाने (Delhi Bomb Blast) हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला (Delhi Red Fort Blast) मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी 6.52 वाजता भयंकर स्फोट झाला.
2/10
दिल्लीतील या स्फोटात आतापर्यंत 9 जण ठार व 24 जण जखमी झाले. या स्फोटात अनेकांचे हात-पाय, शरीराच्या विविध भागांचे अवयव उडाल्याचे देखील समोर आले.
3/10
स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. जवळपास 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या.
4/10
कारचा स्फोट होण्याआधी सदर i-20 कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये जवळपास 3 तास उभी होती.
5/10
दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत झालेला स्फोट अधिक तीव्रतेचा होता.
Continues below advertisement
6/10
फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका आहे. त्यामुळे फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
7/10
दरम्यान फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.
8/10
दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. तसंच 350 किलो स्फोटकंही जप्त करण्यात आलीत. यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आलीय.
9/10
फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.
10/10
फरीदाबादमधील कारवाईचा दिल्ली स्फोटाशी काही संबंध आहे का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Sponsored Links by Taboola