In pics | लॉकडाऊनमुळं भीतीनं स्थलांतरित मजुरांनी धरल्या परतीच्या वाटा
कोरोना विषाणूच्या हाताबाहेर चाललेल्या संसर्गाच्या साखळीला नियंत्रणात आणत ही साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न प्रशासन करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनावर मात करण्यासाठीच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
संपूर्ण देशात विविध स्तरांवर लॉकडाऊन, संचारबंदीचे निर्णय़ घेण्यात येत आहेत.
सोमवारी देशाची राजधानी दिल्लीतही हेच चित्र पाहायला मिळालं.
दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्तीच्या 6 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्यांनी सर्वांनाच या संकटसमयी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर स्थलांतरित मजुरांनी लॉ़कडाऊनचा कालावधी वाढवलाही जाऊ शकतो, या भीतीपोटी पुन्हा एकदा परतीच्या वाटा धरल्या.
दिल्लीतील आनंद विहार बस टर्मिनल येथे तुफान गर्दी पाहायला मिळाली, दिल्लीच्या रस्त्यांवरही चित्र काहीसं असंच होतं. (सर्व छायाचित्र- पीटीआय)