Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळ किती भयंकर? समोर आली सॅटेलाइट दृश्यं; पाहा...
दरम्यान, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका अंतराळवीराने चक्रीवादळाची काही छायाचित्रं शेअर केली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अरबी समुद्रावरील चक्रीवादळ बिपरजॉयची काही छायाचित्रं पोस्ट केली आहेत.
याच्या दोन दिवसांपूर्वी अंतराळवीर अल नेयादीने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये अरबी समुद्रावर प्रचंड वादळ निर्माण झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यावेळी वादळ भारतीय किनार्याकडे सरकत होते.
सध्या 74,000 हून अधिक लोकांना किनारी भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ गुरुवारी (15 जून) संध्याकाळी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ बिपरजॉय सध्या गुजरातच्या किनारपट्टीवर आहे. वादळामुळे गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात तसेच पाकिस्तानच्या किनारी भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू लागले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ हे गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्र प्रदेश, मांडवी किनारा आणि दक्षिण पाकिस्तानमधील कराचीच्या लगतच्या प्रदेशातून जाईल. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी पर्यंत जाऊ शकतो.