Cyclone Biparjoy : गुजरातला चक्रीवादळाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत, वादळी वाऱ्यांसह पाऊस कायम
अत्यंत तीव्र चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसखल भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
आजही गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरात किनारपट्टीवर धडकलं. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून एकूण 99 गाड्या रद्द केल्या आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर त्यातील वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे, मात्र चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे.
काही भागात पाणी साचलं आहे. तसेच पाऊसही सुरु असल्याने बचावकार्यात अडखळे येत आहेत.
गुजरातसह राजस्थान, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ आता राजस्थानला पोहोचलं आहे.