Covid19 Updates : देशातील कोरोना संसर्गात किंचित वाढ, XBB व्हेरियंटचे रुग्ण किती? जाणून घ्या...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात बुधवारी 175 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातील कोविड रुग्णांची संख्या 4.46 कोटी आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,30,707 आहे.
भारतात आतापर्यंत 220 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोविड-19 रिकव्हरी रेट 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
कोरोना संसर्गातून आतापर्यंत 4,41,45,854 लोक बरे झाले आहेत तर, मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.
अमेरिकेत (America) धुमाकूळ घालणाऱ्या XBB.1.5 सब व्हेरियंटच्या (Coronavirus XBB 1.5 Variant) भारतातील रुग्णांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.
सध्या देशात कोरोनाच्या XBB व्हेरियंटचे (XBB Variant) पाच रुग्ण आहेत. गुजरातमध्ये (Gujrat Corona Patients) तीन रुग्ण आढळले असून कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे.
देशातील कोरोना संसर्गात किंचित वाढ झाली आहे. आज 175 रुग्ण सापडले आहेत. काल देशात 173 रुग्ण सापडले होते.
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
या पार्श्वभूमीवर या सहा देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क आहे. खबरदारीची पावले उचलली जात आहेत. कोविड चाचणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे.
आरोग्या प्रशासनाकडून नागरिकांन बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
image 12